WhatsApp Image 2025-08-25 at 6.55.48 PM

ONLINE PAYMENT FACILITY

Gpay,Phonepay Number : 98228 28622

BANK NAME: STATE BANK OF INDIA

BANK ACCOUNT NAME : NETAJI SUBHASHCHANDRA BOSE PRATISHTHAN

BANK ACCOUNT NUMBER : 00000043283513282

IFCE CODE : SBINO001110

…………………….

TAN no. PNEN24292C

LEI no. 335800OBGPO4W4NS2V19

 

महाराष्ट्राला भावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व भव्य छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपिठाची संकल्पना...

प्रतिष्ठानच्या याच सांस्कृतिक विभागांतर्गत देशाला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज, सोबतच अनेकांना न उमजलेले आपले शिवबा राजे व त्यांच्या नजरे पलीकडच्या अष्ठपैलूंना एका बहुउद्देशीय भव्य शिवज्ञानपीठाच्या उभारणीतून तमाम शिवभ्यासक व शिवप्रेमींच्या समोर आणणे या महत्वकांक्षी संकल्पाला उत्स्फूर्त लोक सहभागातून व उदार लोक योगदानातून या शिव ज्ञानपीठाला मूर्त स्वरूप देण्याचे या प्रतिष्ठानचे उद्दिष्ठ व ध्येय आहे. महाराष्ट्र राज्यातील थोर संतांची परंपरा लाभलेल्या जगद्‌गुरू संत ज्ञानेश्वर महाराज्यांच्या आळंदी ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्याच्या पवित्र मार्गावरील, राजधानी सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील माउलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण जेथे होते, असे हे माउलींच्या व अनेक संतांच्या पदस्पशनि पवित्र झालेले तरडगांव येथे लोक योगदानातून काळ्या पाषाणातील छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ व अनाथ मुलासाठी वसतिगृह साकारणार आहे.

नियोजित छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपिठातील सुसज्ज सेवा-सुविधा व दालने…

विविध प्रकारचे प्रशिक्षण तसेच अभ्यासक्रम वर्ग कक्षांच्या माध्यमातून या ज्ञानपीठामध्ये परिपूर्ण देशाची व महाराष्ट्राची ऐतिहासिक व अध्यात्मिक माहिती व ज्ञानार्जनासाठी तज्ञ शिव अभ्यासक व कुशल व अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली संस्कार वर्ग, पर्यावरण दृष्टीकोन, इतिहासाचे जतन, सर्व धर्म समभाव, महाराजांचे कार्यकर्तृत्व, महाराजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन, अभ्यासक व गरजू व अनाथ मुलांकरीता मोफत वसतिगृह व प्रशिक्षणार्थी साठी मोफत शैक्षणिक सुविधा सदर ज्ञानपीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सामाजिक दायीत्वाची जाणीव पूरक व पोषक कला संस्कृतीचे दालन, ऐतिहासिक व वैज्ञानिक पुस्तकांचे संग्रहालय उपलब्ध करण्यात येणार आहे. या ज्ञानार्जना सोबतच निष्णात शस्त्रविद्या, धनुर्विद्या, नेमबाजी, दांडपट्टा मल्लखांब व इतर मर्दानी खेळांचे समग्र प्रशिक्षण या छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.

नक्कीच आपण हि या आमच्या नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या महत्वकांक्षी शिवस्मारक शिवालय व छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठाच्या नियोजित, प्रस्तावित प्रकल्प उभारणीच्या सद्‌कार्यात संस्था, सामाजिक मंडळ अथवा व्यक्तिगत स्वरुपात सहभागी होऊन व इतरांना देखील सहभागी करून, अग्रभागी राहून बहुमोलाचे आर्थिक तसेच वैयक्तिक सहकार्य करावे. हीच अपेक्षा व विनम्र आवाहन

Support

Empowering lives through education and healthcare initiatives.

Impact

MO: 9822828622

contact@netajisubhashchandrabosepratishthan.in

Growth