नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानच्या कार्यभूमीची पार्श्वभूमी

देशातील महान स्वातंत्र्य वीरांचे बलिदान, त्यांची चीरस्मृती विविध सामाजिक, विधायक कार्यक्रमाच्या रूपाने सतेज आणि सजीव राहाव्यात व त्या सत्कारणी लागाव्यात, त्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक व ऐतहासिक उपक्रमाच्या माध्यमातून जोपासल्या जाव्यात या प्रेरक आणि स्फूर्तीदायी प्रामाणिक भावनेतून सन २००५ मध्ये आम्ही काही सेवाभावी कामगारांनी एकत्र येऊन नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठान स्थापन केले. 

पदोपदी सामाजिक जाण व क्षणोक्षणी सामाजिक भान ठेवून मागील तीन दशकापासून पुणे शहरामध्ये लोक सहभागातून आणि लोक योगदानातून अन्याय पिडीत लोकांसाठी व असंघटीत कामगारांसाठी काम करणारी संघटना व प्रतिष्ठान या भावनेने नेताजी सुभाषचंद्र बोस प्रतिष्ठानकडे पहिले जाते. पूर्व पीएमटीच्या व सध्याच्या पीएमपीएमएलच्या कामगार नेतृत्वाच्या रूपाने प्रतिष्ठानचा चालू झालेला प्रवास हा पुणे महानगरपालिकेच्या असंघटीत कंत्राटी कामगारांना न्याय देण्यापर्यंत ठामपणे उभा राहिला व या सर्वांना त्यांच्याच साथीने व सहकार्यान यथोचित न्याय देवून, त्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी देखील लावले.

महाराष्ट्राला भावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व भव्य छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपिठाची संकल्पना.

महाराष्ट्राला भावलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व भव्य छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपिठाची संकल्पना.

प्रतिष्ठानच्या याच सांस्कृतिक विभागांतर्गत देशाला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज, सोबतच अनेकांना न उमजलेले आपले शिवबा राजे व त्यांच्या नजरे पलीकडच्या अष्ठपैलूंना एका बहुउद्देशीय भव्य शिवज्ञानपीठाच्या उभारणीतून तमाम शिवभ्यासक व शिवप्रेमींच्या समोर आणणे या महत्वकांक्षी संकल्पाला उत्स्फूर्त लोक सहभागातून व उदार लोक योगदानातून या शिव ज्ञानपीठाला मूर्त स्वरूप देण्याचे या प्रतिष्ठानचे उद्दिष्ठ व ध्येय आहे. महाराष्ट्र राज्यातील थोर संतांची परंपरा लाभलेल्या जगद्‌गुरू संत ज्ञानेश्वर महाराज्यांच्या आळंदी ते पंढरपूर या पायी पालखी सोहळ्याच्या पवित्र मार्गावरील, राजधानी सातारा जिल्ह्यातील, फलटण तालुक्यातील माउलींच्या पालखीचे पहिले उभे रिंगण जेथे होते, असे हे माउलींच्या व अनेक संतांच्या पदस्पशनि पवित्र झालेले तरडगांव येथे लोक योगदानातून काळ्या पाषाणातील छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ व अनाथ मुलासाठी वसतिगृह साकारणार आहे.

Support

Empowering lives through education and healthcare initiatives.

Impact

MO: 9822828622

contact@netajisubhashchandrabosepratishthan.in

Growth